राज्यात विधानसभा निवडणुक कधी होणार? मोठी अपडेट समोर 

राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० सप्टेंबरपासून लागू होईल आणि ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान होईल, अशी शक्यता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बहुधा, राज्यातील विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होईल, असे सांगण्यात आले आहे. याबाबतचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

 

विधानसभा निवडणुकीबाबत अधिकारी काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० सप्टेंबरपासून लागू होईल.

ऑक्टोबरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मतदान शक्य.

२० ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.

मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची सूचना.

 

एका अधिकाऱ्याने सांगितले की, २०१९ मध्ये २७ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली होती. तर २१ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. तर २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता.” आता आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहोत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, अंतिम मतदार यादी २० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.” असेही अधिकाऱ्याने पुढे म्हटले.

निवडणूक आयोगाने २० जून रोजी महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू आणि काश्मीरमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यांना १ जून २०२४ ही पात्र तारीख म्हणून फोटो मतदार यादीचा विशेष आढावा घेण्यास सांगितले आहे.

Leave a Comment