भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ ; कोर्टाने दिला “हा” निर्णय

नाशिक – महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याला शनिवारी (दि. १८) रोजी चौथ्या गुन्ह्यात न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) ताबा घेतल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अशोक खरातला पाच दिवसांची म्हणजे (दि.२३ एप्रिलपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

एकीकडे पोलीस कोठडीचा मुक्काम लांबत असतानाच, दुसरीकडे ‘ईडी’ने त्याच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे खणून काढण्यास सुरुवात केल्याने खरातच्या अडचणीत वाढ झाली आहे. खरातवर आतापर्यंत एकूण १५ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे ८ गुन्हे हे केवळ महिलांवरील अत्याचाराचे आहेत. उर्वरित ७ गुन्हे खंडणी, सावकारी आणि फसवणुकीशी संबंधित आहेत.

दरम्यान, आतापर्यंत केवळ ४ गुन्ह्यांचा तपास झाला असून, अद्याप ११ गुन्ह्यांमध्ये त्याची चौकशी होणे बाकी आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात आज रविवारी (दि. १९) एसआयटीने खरातला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. यामुळे खरातचा पुढील काळ पोलीस कोठडीतच जाणार असल्याचे दिसत आहे.

Leave a Comment