मोठी बातमी! वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत मिळणार, अजित पवारांची घोषणा 

आज २८ जूनला राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती देत आहे. सरकार या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी या वर्गासाठी मोठ्या घोषणा केल्या आहे.

विशेष म्हणजे याच अर्थसंकल्पात राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे.

अशातच अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबियांना होणार आहे

‘महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल’

Leave a Comment