बिग ब्रेकिंग! महाराष्ट्रातील ‘या’ महिलांना महिन्याला मिळणार १ हजार ५०० रूपये 

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आहे.

जुलै २०२४ पासून योजना सुरू करण्यात आल्याचं पवार म्हणाले. या योजनेत २१ ते ६० वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२८) रोजी विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महिलांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे. सध्या महायुती सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनात अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला.

Leave a Comment