संगमनेर (DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच जिजाबाई सागर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली. ग्रामसभेत ग्रामसेवक नितीन पवार यांनी विविध विषयांवर माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, पीक कर्ज बाबत चर्चा, म ग्रां रो ह योजना, बांबू योजना व इतर योजनांविषयी चर्चा करण्यात आली.
तसेच 15 वित्त झालेली कामे व राहिलेले कामे पूर्ण करणे, विकास कामांवर चर्चा करण्यात आली. तसेच स्वस्त धान्य मिळणे बाबत लाभार्थी यादी करणे, गावातील पोल्ट्री फॉर्म व त्यामुळे होणाऱ्या माशा व उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. तसेच सन 2024-25 कर आकारणीविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
