मोठी बातमी! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार थोडक्यात बचावले, वाचा नेमकं काय घडलय

मुंबई – हेलिकॉप्टरने नागपूर ते गडचिरोली असा प्रवास करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे हेलिकॉप्टर प्रवासा दरम्यान भरकटल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत दोन्ही उपमुख्यमंत्री बचावले असून या हेलिकॅाप्टरमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हेदेखील उपस्थित होते.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे नागपूरहून गडचिरोली दौऱ्यावर जात होते. या प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॅाप्टर खराब वातावरणामुळे ढगात भरकटले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॅाप्टर ढगात भरकटल्याची माहिती समोर येताच प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॅाप्टर जमीनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, या घटनेनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, या घटनेमुळे माझ्या पोटात गोळाच उठला होता.मात्र, पांडुरंगाच्या कृपेने आम्ही सर्व सुखरुप खाली उतरलो.खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर ढगांमध्ये भरकटले होते. पंरतु, पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर (Helicopter) जमिनीवर उतरविल्याने मोठी दुर्घटना टळली, असे त्यांनी म्हटले

Leave a Comment