नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाला मिळालेले दणदणीत यशानंतर अजित पवार गटाचे काय होणार? अशी सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये बोलताना शरद पवार यांनी उत्तर दिले.
अजित पवार पुन्हा परत येणार का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. ते पुढे म्हणाले की, घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ती तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे स्पष्ट केले.
