साकूर – स्पर्धा परीक्षा ही एक कठीण आणि आव्हानात्मक परीक्षा आहे. या परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी चांगल्या नियोजन आणि मेहनतीची, संयमाची व सरावाची आवश्यकता असते. यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी आपली ध्येय निश्चिती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन साई करिअर अकॅडमीचे संचालक प्रा.भगवान अहिरे यांनी केले.
ते संगमनेर तालुक्यातील साकूर येथील रमेश फिरोदिया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात तयारी स्पर्धा परीक्षेची या विषयावर बोलत होते. महाविद्यालयात गुरुवारी स्पर्धा परीक्षा विभागाच्या वतीने तयारी स्पर्धा परीक्षेची या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या.डॉ. हेमलता राठोड, उपप्राचार्य डॉ. सचिन घोलप, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.रंजीत गिरी, कला विभाग प्रमुख प्रा.कल्पना शेळके, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.प्राजक्ता बिडवे डी.एस न्यूज 24 चे प्रमुख किरण पुरी, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख प्रा. पोपट खेमनर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभाग समन्वयक प्रा.म्हतू खेमनर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हेमलता राठोड अध्यक्षीय मनोगतात म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे ही महाविद्यालयाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ॲकॅडमी सुरू करण्यात येणार आहे, त्यामधून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी करता येईल. पोलीस व आर्मी प्रशिक्षण, गट क पदे यांची संपूर्ण तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. स्पर्धा परीक्षा ही खूप व्यापक आणि मोठी संकल्पना आहे. ज्यामध्ये शासकीय सेवेतील अनेक जागा, अनेक पदे समाविष्ट आहेत.त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे चांगले नियोजन व वेळापत्रक तयार करून त्यांचे पालन करावे.
या कार्यक्रमासाठी प्रा.दत्तात्रय असावले, प्रा.गणेश कुलकर्णी, प्रा.गणेश साळुंके, प्रा.योगेश साळुंके, शंकर राशिनकर, प्रा.लक्ष्मण कातोरे, प्रा.राजेंद्र लेंडे, प्रा.संदिप खेमनर, प्रा.शबाना शेख, प्रा.जया रक्ते, प्रा.प्रियंका हाके, प्रा.स्वाती ढोकरे , प्रा. स्वाती सागर, मनोहर दुरगुडे, महेश पोखरकर, पुंजाहरी वारे, लक्ष्मण जाधव, भाऊसाहेब बहिरट व सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.म्हतू खेमनर यांनी केले. तसेच प्रास्ताविक प्रा.पोपट खेमनर यांनी तर आभार प्रा.शबाना शेख यांनी मानले.
