अबब! ग्रामपंचायत कार्यालयाला पुराचा वेढा, सरपंचांनी थेट पुराच्या पाण्यात पोहत ग्रामपंचायत गाठल

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात मरून नदीला पूर आल्यामुळे नक्षी या गट ग्रामपंचायतीअंतर्गत मांगली गावात पुराचे पाणी शिरले आहे. परिणामी, ग्रामपंचायतीशी आणि तालुक्याशी या गावाचा संपर्क तुटला आहे. गावात येणारे सर्व मार्ग बंद असल्यामुळे प्रशासनही मांगली गावात पोहचू शकत नव्हते. त्यावेळी गावाचे 28 वर्षीय सरपंच अनिकेत वराडे यांनी स्वत: पुराच्या पाण्यात पोहत मांगली गावात पोहोचले आणि मांगली गावकऱ्यांना दिलासा दिलाय. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेचे सध्या परिसरात कौतुक केलं जात आहे.

गेल्या दोन दिवसापासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, आजही विदर्भातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. एकट्या नागपूर शहरात पाहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाले ओढे ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे.

अशातच जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात मरून नदीला पूर आल्यामुळे नक्षी या गट ग्रामपंचायतीअंतर्गत मांगली गावात पुराचे पाणी शिरले आहे. परिणामी सर्वत्र गाव पाण्याने वेढले आहे. त्यामुळे या पाण्यातून मार्ग काढत या गावाचे 28 वर्षीय सरपंच अनिकेत वराडे यांनी स्वत: पुराच्या पाण्यात पोहत मांगली गावात पोहोचले आणि मांगली गावकऱ्यांना दिलासा दिलाय.

Leave a Comment