संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर येथील बाळासाहेब भाऊसाहेब सागर यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी ही निवड केली आहे. तसेच संगमनेर तालुक्यात विविध पदांवर इतर पदाधिकाऱ्यांच्या देखील निवडी करण्यात आल्या आहेत.
बाळासाहेब सागर यांची साकूर पठार भागातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व साकूर सोसायटी चे चेअरमन इंद्रजित खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठ काम करत आहेत. तसेच त्यांचा पठार भागात दांडगा संपर्क देखील आहे. त्यामुळेच त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. बाळासाहेब सागर यांच्यावर प्रथमच उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
