संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या असून या नवीन कार्यकारिणीत मुख्य समन्वयक, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महासचिव आणि तालुका कार्यकारणी सदस्य यांचा समावेश आहे. या निवडींमध्ये साकूर येथील बाळासाहेब सागर यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या उपाध्यक्ष, किशोर गाडेकर यांची समन्वयक तर साहिल मनियार यांची युवक पदाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडी झाल्याबद्दल साकूर येथील ग्रामपंचायतील सभागृहात सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर व साकूर सोसायटी चे चेअरमन इंद्रजित खेमनर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी मिळाल्याने युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. तसेच आगामी काळात पक्षवाढीसाठी याचा फायदा देखील होणार आहे.
साकूर पठार भागात माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस पक्षाचा दबदबा आहे. आगामी काळात कॉंग्रेस पक्षात काम करण्यासाठी नवनवीन युवकांना संधी मिळावी या उद्देशाने बाळासाहेब सागर, किशोर गाडेकर, साहिल मनियार यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. युवकांचे प्रेरणास्थान म्हणून ओळखले जाणारे साकूर सोसायटी चे चेअरमन इंद्रजित खेमनर युवकांना एकत्रित करण्याचे काम करत आहे. तसेच एकजूट होऊन पक्षांचं कार्य जोमाने वाढविण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. त्यातच या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीने आगामी काळात आणखी जोमाने काम सुरू होणार आहे.
यावेळी सत्कार समारंभ प्रसंगी युवा नेते अनमोल खेमनर, मुळा खोरे दूध संस्थेचे व्हा चेअरमन कैलास गाडेकर, गौरव मैड, बाळासाहेब पेंडभाजे, संतोष कुटे, मिथून केदारी, सुभाष शेंडगे, अक्षय गाडेकर, अविनाश रासने आदि मान्यवर उपस्थित होते.
तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे, मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांनी अभिनंदन केले आहे.
