अरे देवा! बायकोला निवडणुकीत उतरवण नवऱ्याला पडल भारी, बॅनरवर नाव वाचून अख्ख गाव हसल

भोपाळ : भारतामध्ये निवडणूक कोणतीही असो, त्याबाबत लोकांमध्ये कमालीची उत्सुकता असते. निवडणुकीच्या काळात लोक आपल्या आवडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचा प्रयत्न करतात; मात्र त्यासाठी उमेदवाराला जोमाने प्रचार करावा लागतो. कारण, लोकांना उमेदवार माहिती असेल, तरच ते त्याला मतदान करतील.

उमेदवार आपल्या प्रचारासाठी अनेक पद्धतींचा अवलंब करतात. पूर्वी उमेदवार आपल्या मतदारसंघात किंवा वॉर्डमध्ये फिरून जनतेची भेट घ्यायचे. निवडून आल्यानंतर जनतेच्या कल्याणासाठी कोणती कामं केली जातील, याची माहिती ते लोकांना द्यायचे. आता प्रचारासाठी यासह इतरही अनेक मार्गांचा वापर केला जातो आणि त्याद्वारे उमेदवाराला प्रसिद्ध केलं जातं. यामध्ये पोस्टर्स आणि पॅम्प्लेट्सचा समावेश आहे. पोस्टर्स आणि पॅम्प्लेट्सवर उमेदवाराचं नाव, त्याचं निवडणूक चिन्ह आणि त्याने दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख असतो. मध्य प्रदेशातल्या सकरावा गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या एका उमेदवाराचं पॅम्प्लेट सोशल मीडियावर व्हायरल झालं.

या व्हायरल झालेल्या पॅम्प्लेटवर एका महिलेचा फोटो आहे. सकरावा गावात ग्रामपंचायत निवडणुकीत या महिलेने सदस्यपदासाठी निवडणूक लढवली होती. तिच्या फोटोच्यावर वॉर्डचे तपशील आहेत. शेजारी एका पुरुषाचा फोटो दिसत आहे. नीरज शर्मा नावाचा हा पुरुष या महिलेचा नवरा आहे; पण पॅम्प्लेटवरच्या इतर तपशीलांऐवजी महिलेच्या नावाने लोकांचं सर्वांत जास्त लक्ष वेधून घेतले. पॅम्प्लेटवर महिलेचं नाव ‘श्रीमती सेक्सी देवी’ असं लिहिलेलं होतं.

व्हायरल होत असलेल्या या पॅम्प्लेटची सत्यता जाणून घेण्यासाठी त्यावर दिलेल्या क्रमांकावर कॉल करण्यात आला; पण तो फोन क्रमांक बंद असल्याचं सांगण्यात आलं. या परिसरात दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायत निवडणुकांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे फोटोत दिसणाऱ्या या उमेदवाराची ओळख पटू शकली नाही. वास्तव जाणून घेण्याऐवजी लोकांनी या पॅम्प्लेटची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली. नेटिझन्सनी या महिलेच्या पतीला जगातला सर्वांत दुर्दैवी पती म्हटलं आहे. एका युझरने कमेंट केली, की त्या महिलेचा नवरा तिचं नाव घेताना किती लाजत असावा.

सोशल मीडियावर असे गमतीशीर फोटो आणि व्हिडिओ सातत्याने व्हायरल होतात. युझर्सदेखील त्यावर मजेशीर कमेंट्स करून आनंद घेतात. ग्रामपंचायत निवडणुकीतल्या एका उमेदवाराच्या पॅम्प्लेटबद्दलदेखील तेच घडलं.

Leave a Comment