लग्नाची पहिली रात्र वधू-वरासाठी खूप खास असते. पण जर वधूला कळालं, की लग्नाची रात्र तिच्यासोबत तिच्या पतीने नव्हे तर दुसरंच कोणीतरी घालवली आहे तर? कोणतीही महिला हे सहन करू शकणार नाही.
पण असाच प्रकार उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये घडला आहे. यात नवरदेव नाही तर त्याचा भाऊच दोन महिन्यांपासून वधूसोबत झोपत होता. लग्न झाल्यापासून तिला रोज मिठाई देऊन झोपवलं जायचं. जेव्हा वधूला संशय आला की काहीतरी गडबड आहे. तेव्हा एके दिवशी वधूने मिठाई खाल्ली नाही. यानंतर रात्री जेव्हा तिने बेडवर आपल्या दिराला पाहिलं तेव्हा ती हादरली.
याबाबत वधूने सासरच्या मंडळींना सांगितलं. पण सगळे तिलाच दोष देऊ लागले. तिच्या नवऱ्यानेही तिला साथ दिली नाही. वधू आपल्या आईवडिलांच्या घरी परत आली. तिने आपला दाजी, पती आणि सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
शक्ती फार्म परिसरात राहणाऱ्या एका नवविवाहित वधूने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, एप्रिलमध्ये तिचं लग्न यूपीच्या पिलीभीत येथे राहणाऱ्या तरुणाशी झालं होतं. नववधूने पतीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. वधूचा आरोप आहे की लग्नाच्या रात्री तिच्या पतीने तिला नशेचा पदार्थ खाण्यासाठी दिला होता. ते खालल्याने ती बेशुद्ध झाली होती. ती बेशुद्ध असताना तिच्या दिराने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.
पीडितेने सांगितलं की, सकाळी उठल्यावर तिला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले गेले असल्याचं वाटलं. सासरच्या घरी असताना रोज रात्री हा प्रकार पुन्हा सुरू झाला. वधूच्या लक्षात आलं, की मिठाई खाल्ल्यानंतर तिला काहीतरी होतं आणि तिथून पुढे तिला काही आठवत नाही. दुस-या दिवशी तिने आपल्या दिराला तिच्या पलंगाजवळ पाहिलं. सुरुवातीला ती दुर्लक्ष करत राहिली. मात्र दोन महिने उलटल्यानंतर जून महिन्यात एका रात्री तिने पतीने दिलेली मिठाई खाल्ली नाही.
पीडितेने सांगितलं की – तिचा नवरा मध्यरात्री खोलीबाहेर गेला. यानंतर दीर खोलीत आला आणि अश्लील कृत्य करू लागला. पण नवरीने ओरडायला सुरुवात केली. सासरचे सगळे तिथे आले. हा प्रकार त्यांना सांगितल्यावर त्यांनी तिलाच धमक्या देण्यास सुरुवात केली. दुस-याच दिवशी नववधू तिच्या माहेरी गेली. घरच्यांना सगळा प्रकार सांगितला. विवाहित महिला काही दिवस ट्रॉमामध्ये राहिली. त्यानंतर आता तिने आपला दीर, पती आणि सासऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं की – आम्ही विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
