महाराष्ट्राला पहिली महिला महाराष्ट्र केसरी मिळाली आहे. सांगलीची प्रतीक्षा रामदास बागडी हिने कल्याणच्या वैष्णवी पाटील या महिला मल्लाला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे.
विशेष म्हणजे महिला महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना अतिशय थरारक ठरला. कल्याणच्या वैष्णवी पाटीलने सगल चार गुण मिळत प्रतीक्षाचं टेन्शन वाढवलेलं.
पण शेवटच्या क्षणात प्रतीक्षाने वैष्णवीला चितपट करत चार गुण मिळवले. त्यामुळे पहिल्या महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा मिळवण्यात प्रतीक्षाला यश आलं.
