मोठी बातमी! राष्ट्रवादी नेत्याच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तरूणाचा मृत्यू

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या जय मालोकार या तरुणाचा मृत्यू झाला आहे. जय मालोकर याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जय मालोकार हा मनसे कार्यकर्ता आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली होती. ही टीका मनसे कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला होता.

अमोल मिटकरी अकोल्यात विश्राम गृहात गेले असताना बाहेर उभ्या असलेल्या कारला मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं होतं. यावेळी चांगलाच राडा झाला होता. या राड्यानंतर जय मालोकरला अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळे जयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जय मालोकार हा 28 वर्षांचा होता. त्याला आज दुपारच्या राड्यानंतर अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्याच्या छातीत अचानक दुखू लागलं होतं. यानंतर त्याला अकोल्यातली रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जय मालोकार याला हृदय विकाराचा झटका येईल, अशी कुणाला कल्पना नव्हती. पण जय मालोकारला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या झटक्यात त्याचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment