मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणेंनी (Sharad Sonawane) आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची (Jayant Patil)भेट घेतली.
तसेच त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला. शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात झाली आहे. जुन्नरमधील सभेनंतर जयंत पाटील हे दुपारच्या भोजनासाठी जय हिंद महाविद्यालयात थांबले होते. तिथं सोनवणेंनी हजेरी लावत जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख तसेच खासदार अमोल कोल्हेंसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.
जेवण करताना शरद सोनवणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही चर्चा केली आहे का, अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे. गेल्याच महिन्यात अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सोनवणेंनी तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जात आहे.
