लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवाने मोबाईलमध्ये दाखवल अस काही ; नवरी रडतच पळाली

लखनऊ : लग्न हा कोणत्याही मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. वधू-वरांसाठी लग्नाची पहिली रात्र आणखी खास असते. पण लग्नाच्या रात्रीच जोडीदाराचं काळं सत्य तुम्हाला कळलं तर? हे कोणासाठीही मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नसेल. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये घडला आहे. इथे लग्नाच्या रात्री नवरदेवाने आपल्या वधूला मोबाईलवर असं काही दाखवलं, ज्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे पाहून नवरी बेडवरुन खाली उतरली. ती रडत खोलीबाहेर आली आणि तिने सासरच्या मंडळींना वराच्या कृत्याबद्दल सांगितलं. त्यावेळी सासरच्या लोकांनी वधूचं ऐकलं नाही, असा आरोप आहे. त्यानंतर वधूने तिच्या पालकांना फोन करून बोलावलं. वराच्या कृतीवर नवरीच्या आई-वडिलांनी आक्षेप घेतला तेव्हा सासरच्यांनी सांगितलं की, तू निश्चिंत राहा, भविष्यात असं काही होणार नाही. कसा तरी समेट झाला. पण तरीही नवरदेवामध्ये सुधारणा न झाल्याने वधू आपल्या माहेरी परतली, आता तिने नवरदेव आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जसराना येथील मदनपूर गावात राहणाऱ्या तरुणीचं लग्न आग्राच्या ताजगंज येथील बरौली अहिर गावात राहणाऱ्या शुभमसोबत ठरलं. दोघांच्या घरच्यांच्या परस्पर संमतीने हा विवाह झाला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या वडिलांनी लग्नासाठी 35 लाख रुपये खर्च केले. मोठ्या थाटामाटात लग्नाचे विधी पूर्ण केले आणि हुंडाही दिला. आयुष्याची नवी स्वप्नं घेऊन ती पतीसोबत सासरी पोहोचली. पण लग्नाच्या रात्रीच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, लग्नाच्या रात्री तिचा पती तिच्या जवळही आला नाही. पतीने पीडितेकडे आपल्या भावना व्यक्त करत हे लग्न त्याच्या इच्छेविरुद्ध झालं असल्याचं सांगितलं. त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचं त्याने सांगितलं आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे, असं तो म्हणाला. हद्दल तर तेव्हा झाली जेव्हा तो वधूला त्याच्या मोबाईलमधील प्रेयसीचा फोटो दाखवू लागला. नवऱ्याचं बोलणं ऐकताच नवरीच्या पायाखालची जमीन सरकली. तिचा आनंद आणि नव्या आयुष्याची स्वप्नं क्षणार्धात भंग पावली.

पतीने तिला मारहाणही केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. लग्नाच्या रात्री पतीने केलेल्या गैरवर्तनामुळे तिचं मन दुखले होतं. मध्यरात्री ती रडत खोलीबाहेर आली. ‘मी आई-वडिलांना सांगितल्यावर ते माझ्या सासरच्या घरी आले. मात्र, भविष्यात असं काही होणार नाही, अशी ग्वाही सासरच्या मंडळींनी दिली. आश्वासन देऊनही पतीच्या वागण्यात फरक पडला नाही’, असा पीडितेचा आरोप आहे. कंटाळलेली पीडित मुलगी तिच्या माहेरच्या घरी परतली आणि आता तिने एसएसपीकडे कारवाईची मागणी करणारा अर्ज दिला आहे.

Leave a Comment