आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

 

वृषभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. कामानिमित्त प्रवास होतील.

 

मिथुन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपीडा नाही.

 

कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

 

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कन्या : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

 

तूळ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. व्यवसायात वाढ होईल.

 

वृश्‍चिक : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

 

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

 

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

 

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

 

मीन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

Leave a Comment