मेष : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाहीयाची दक्षता घ्यावी.
वृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
वृश्चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
धनु : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
