सप्टेंबरमध्ये कसा असणार पाऊस, वाचा हवामान अंदाज 

अहमदनगर – सप्टेंबर महिना हा अधिक प्रकाशमान व उष्णतेचा महिना आहे. या काळात मुंबईसह कोकणात 15, नागपूर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरसह 10 ते 12, तर उर्वरित विदर्भ, संपूर्ण मराठवाडा खांदेश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात दमदार पाऊस पडत असतो.

यंदा देखील सप्टेंबर महिन्यांत टप्प्याने मुसळधार पावसाची तीन टप्पे होणार असून यामुळे राज्यातील धरणे ओसांडणार असून नद्या खळखळणार आहेत. एकप्रकारे पावसाच्या या आवर्तनांमुळे जमिनीसह विहीरींच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याचे सेवानिवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

दरवर्षी राज्यात सप्टेंबर महिन्यांत पावसाचे सरासरी 5 ते 7 असतात. यावर्षी 1 ते 5 सप्टेंबर, 12 ते 16 सप्टेंबर आणि 25 ते 29 सप्टेंबर अशा प्रत्येकी पाच दिवसाच्या तीन आवर्तनातून महाराष्ट्रात अंदाजे 10 ते 15 पावसाळी दिवस राहण्याची शक्यता आहे

Leave a Comment