भारताचा पुढचा पंतप्रधान कोण? सर्वेमध्ये “हे” नाव पहिल्या क्रमांकावर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशातील जनतेच्या पसंतीचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मात्र, अभिजीत दिपके यांच्या नावाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

इंडिया टुडे-सीव्होटरच्या ‘मूड ऑफ द नेशन’ (MOTN) सर्वेक्षणानुसार दिपके यांनी आम आदमी पक्षाचे (AAP) प्रमुख आणि आपले माजी बॉस अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाच्या पसंतीत किंचित मागे टाकले आहे.

सर्वेक्षणात पंतप्रधानपदासाठी दिपके यांना 1.3 टक्के, तर केजरीवाल यांना 1.2 टक्के लोकांनी पसंती दिली. दोघांमधील फरक केवळ 0.1 टक्के असला, तरी दिपके यांच्या राजकीय प्रवासाच्या पार्श्वभूमीवर हा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे.

मोदी सर्वाधिक पसंतीचे –

MOTN सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी 48.7 टक्के मतांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 27.1 टक्के पसंती मिळाली. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय 9.2 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 2 टक्के, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना 1.7 टक्के, अभिजीत दिपके यांना 1.3 टक्के आणि अरविंद केजरीवाल यांना 1.2 टक्के पसंती मिळाली.

Leave a Comment