ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसलाय. ठाकरे गटातील त्रिपुरा(Tripura) राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
राज्याच्या राजकारणात सातत्याने शिंदे आणि ठाकरे गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. तसेच राज्यात विविध ठिकाणी सभा घेत शक्तीप्रदर्शन सुरू आहे.
यामध्ये शिंदे गटात आणखीन काही पदाधीकारी सहभागी होणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. अशात ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटातील त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद(Devendra Prasad) यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.
त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद यांनी उद्धव ठाकरे गटाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी त्रिपुरा राज्य प्रमुख देवेंद्र प्रसाद यांचे शिवसेना पक्षात नियुक्ती पत्र देऊन स्वागत केले.
