अबब! मध्यरात्री वहिनीने दिराला प्रेमाने खोलीत बोलावलं नंतर ‘तो’ ओरडतच…..

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. वनांचल कुसमी या आदिवासी भागात ही घटना घडली असून येथे जमिनीच्या वादातून एका महिलेनं तिच्या दिराचा गुप्तांग कापला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

वनांचल कुसमी येथे एका महिलेनं तिच्या दिराला प्रेमानं अर्ध्या रात्री घरी बोलावलं. दीर आल्यानंतर महिलेनं त्याला तिच्या रुममध्ये नेलं. त्यानंतर जे घडलं, त्याची कोणीच कल्पना केली नव्हती. रुममध्ये संबंधित महिलेनं धारदार शस्त्रानं तिच्या दिराचं गुप्तांग कापलं. या हल्ल्यानंतर तो वेदनेनं विव्हळतच रुमच्या बाहेर पळाला. कुटुंबियांना या बद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी जखमी दिराला कुसमी सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळावर धाव घेतली. तसेच दिराच्या तक्रारीवरुन त्याच्या वहिनी विरोधात गुन्हा नोंदवलाय.

उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

दुसरीकडे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे दिराला कुसमी स्वास्थ केंद्रातून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याबाबत सिधी येथील एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘संबंधित युवकानं त्याच्या गुप्तांगावर त्याच्या वहिनीनं वार केल्याचा आरोप केलाय. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. आरोपी महिलेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.’

गावामध्ये विविध चर्चांना उधाण

याप्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडालीय. पोलिसांनी जखमी दिराकडे चौकशी केल्यानंतर जमिनीच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचं समोर आलं आहे. गावातील लोकांमध्ये या घटनेबद्दल विविध चर्चा सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी महिलेची देखील चौकशी सुरू केली आहे. संबंधित महिला व तिच्या दिरामध्ये जमिनीवरून नेमका काय वाद होता? याची माहिती पोलीस घेत आहेत.

Leave a Comment