मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी एक पक्ष फुटला, बड्या नेत्याचा पक्षाला रामराम 

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता आणखी एक राजकीय पक्ष फुटल्याची माहिती समोर येत आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी दिवसरात्र कष्टातून उभ्या केलेल्या शिवसंग्राम पक्षातच उभी फूट पडली आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे यांनी शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पडले आहेत.ते लवकरच नव्या पक्षाची संघटनेची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.

दिवंगत विनायक मेटेंनंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे या शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा असून त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेंबांधणी सुरू केली असून त्यांचे राज्याच्या विविध भागांत दौरेही होत आहेत.अशातच आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. विनायक मेटेंचा प्रचंड विश्वास असलेल्या तानाजीराव शिंदेंनीच शिवसंग्रामची साथ सोडण्याच निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Comment