मेष : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कन्या : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
तुळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
वृश्चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
धनु : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मकर : वादविवाद टाळावेत. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. प्रवास सुखकर होतील.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
