कांद्याला मिळाला तब्बल ‘एवढा’ भाव

राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला जास्तीत जास्त प्रतिक्विंटलला 5500 रुपये भाव मिळाला. मंगळवारी कांद्याच्या एकूण 2528 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर 1 ला 4300 ते 5500 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 3150 रुपये ते 4250 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 2000 रुपये ते 3100 रुपये. गोल्टी कांदा (Onion) 3800 रुपये ते 4200 रुपये. जोड कांदा 1700 ते 2100 रुपये.

यात 9 गोण्यांना 5500 रुपये, 2 गोण्यांना 5300 रुपये तर 83 गोण्यांना 5200 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. 85 गोण्यांना 5100 रूपये. 168 गोण्यांना 4901 ते 5000 रुपये, 44 गोण्यांना 4801 ते 4900 रुपये. 137 गोण्यांना 4701 ते 4800 रुपये, 121 गोण्यांना 4601 ते 4700 रुपये भाव मिळाला. 267 गोण्यांना 4501 ते 4600 रुपये भाव मिळाला. 395 गोण्यांना 4401 ते 4500 रुपये भाव मिळाला.

155 गोण्यांना 4301 ते 4400 रुपये भाव मिळाला. 175 गोण्यांना 4201 ते 4300 रुपये भाव मिळाला. 167 गोण्यांना 4101 ते 4200 रुपये भाव मिळाला. 350 गोण्यांना 3001 ते 4000 रुपये भाव मिळाला. 162 गोण्यांना 2001 ते 3000 रुपये भाव मिळाला. 91 गोण्यांना 1000 ते 2000 रुपपये भाव मिळाला.

Leave a Comment