डाळिंबाला किलोला मिळाला ५०१ रूपयांचा भाव

पुणे – नगर तालुक्यातील युवा प्रयोगशील शेतकऱ्याच्या डाळिंबालापुणेबाजार समितीच्या लिलावात प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला आहे. यंदाच्या डाळिंबाच्या हंगामातील हा सर्वोच्च भाव ठरला आहे.

नगर तालुक्यातील पोखर्डी येथील अक्षय संजय कराळे या तरुणाने शिक्षणानंतर नोकरीच्या मागे न लागता स्वतःला शेतीत झोकून दिले. अरणगाव (ता. नगर) येथील १० एकर क्षेत्रात बारा वर्षांपासून तो डाळिंबाची लागवड करतो.

मोठ्या कष्टाने या शेतीची तो राखण करतो. पुणेबाजार समितीत त्याने सोमवारी (दि. ९) आपले डाळिंब विक्रीला नेले. तेथील घाऊक बाजारात त्याच्या डाळिंबाला प्रतिकिलो ५०१ रुपयांचा भाव मिळाला.

घाऊक बाजारात डाळिंबाला प्रतिकिलो १०० ते ४०० रुपयांप्रमाणे भाव मिळत आहे. अक्षय कराळे यांचा माल सर्वांत दर्जेदार असल्याने त्यांना विक्रमी भाव मिळाला.

Leave a Comment