मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जुलै आणि ऑगस्ट अशा दोन टप्प्यात 1 कोटी 59 लाख भगिनींना 4787 कोटींचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली होती. जुलै आणि ऑगस्ट अशी एकत्रित 3 हजार रुपयांची रक्कम डीबीटी द्वारे थेट खात्यात जमा करण्यात आली आहे.
या योजनेत अडीच कोटी महिला लाभार्थींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अर्ज घेण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत चालू ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अश्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या ’29 सप्टेंबर’ रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. या निर्णयानंतर आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत.
