ठाकरे गटातील “या” पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी 

भंडारा : विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election 2024) लागण्यापूर्वीचं भंडाऱ्याच्या शिवसेना ठाकरे गटात (Shiv Sena Thackeray Group) दोन गट पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे.

मागील आठवड्यात शिवसेनेच्या भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दोन गटात वाद निर्माण झाला होता. ही बाब शिवसेना मुंबई मध्यवर्ती कार्यालयात पोहचली असून पाच पदाधिकाऱ्यांवर कारवाई करीत त्यांची पदावरून उचलबांगडी केली आहे.

पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्यांमध्ये भंडारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख नरेश डहारे, भंडारा उपजिल्हाप्रमुख दीपक गजभिये, भंडारा विधानसभा संघटक चंदू उके, पवनी शहर प्रमुख शंकर भुरे, पवनी शहर संघटक आकाश दुर्गे या पाच जणांचा समावेश आहे.

Leave a Comment