पुणे – नगर हायवेवर अपघात, महिला ठार

शिरुर – शहरातील पुणे – नगर हायवेवर हॉटेल राजनंदिनी समोर अज्ञात वाहनाने टू-व्हीलरला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर अपघातात तिचा मुलगा जखमी झाला आहे. समोर प्रमिला देवराव राठोड (वय ४४ वर्ष ) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत राम देवराव राठोड यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास शिरूर गावच्या हद्दीत हॉटेल राजनंदिनी समोर पुणे-नगर हायवे रोडवरून राम देवराव राठोड व त्यांची आई प्रमिला देवराव राठोड हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्यादरम्यान प्रमिला देवराव राठोड या पाठीमागे बसल्या होत्या.

ते पुण्याच्या दिशेने जात असताना पाठीमागुन अहमदनगर बाजुकडुन येणा-या अज्ञात वाहनाने हलगर्जीपणे व निष्काळजीपणे मोटार सायकलला पाठीमागुन धडक दिली. सदर अपघातात राम राठोड व त्याची आई प्रमिला राठोड हे खाली रोडवर पडले. यामुळे प्रमिला राठोड यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे.

तर मुलगा राम राठोड याला किरकोळ दुखापत झाला आहे. त्यानंतर अपघातग्रस्तांना मदत न अज्ञात चालक निघुन गेला आहे. त्यामुळे अज्ञात चालकाविरूध्द शिरूर पोलीस स्टेशनला कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उबाळे करीत आहे.

Leave a Comment