मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार याची मोठी उत्सुकता आहे. राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांच्याही मनात निवडणुकीच्या तारखांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केलं आहे. बारामतीमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
शरद पवार म्हणाले , निवडणकू आयोगाची टीम राज्यात आली होती. त्यांनी अनेक पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली. त्यानंतर मी काही राजकीय नेत्यांसोबत बोललो. त्यातून असे दिसते की ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविकास आघाडी उमेदवारांची घोषणा करेल असेही पवार म्हणाले
