मोठी बातमी! काँग्रेसच्या अध्यक्षांची तब्येत बिघडली, भाषण देताना अचानक……

Mallikarjun Kharge : जम्मू-काश्मीरमधील निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कठुआमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करत असताना, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे अचानक मंचावरच आजारी पडले. जसरोटा येथे जाहीर सभेला संबोधित करत असताना मंचावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

व्यासपीठावर भाषण करत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खरगे यांना चक्कर आल्याने ते बेशुद्ध पडू लागले. मात्र, मंचावर उपस्थित असलेले त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि इतर काँग्रेस नेत्यांनी वेळीच त्यांची काळजी घेतली. त्यांना प्यायला पाणी दिले. यादरम्यान काही काळ भाषण थांबवण्यात आले.

मात्र, काही वेळाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पुन्हा सांगितले की, “आम्ही राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी लढू. मी 83 वर्षांचा आहे, मी इतक्या लवकर मरणार नाही. पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर असेपर्यंत मी जिवंत राहील. मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, या लोकांना (केंद्र सरकार) कधीच निवडणुका घ्यायच्या नाहीत. त्यांची इच्छा असती तर एक-दोन वर्षात निवडणुका होऊ शकल्या असत्या… सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ते निवडणुकीसाठी सज्ज झाले.

Leave a Comment