शरद पवारांची मोठी खेळी, अजितदादांना निवडणूकीआधीच धक्का 

भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळं तर्कवितर्क लढवले जात असतानाच विलास लांडे यांचे चिरंजीव विक्रांत लांडे यांनी थेट वडिलांच्या पक्षांतराची घोषणाच करून टाकली.

त्यामुळं विलास लांडे हे लवकरच तुतारी हाती घेणार असल्याचं निश्चित झालं आहे. अजित पवारांना हा धक्का मानला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना कमालीचा वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप गुलदस्त्यात असलं तरी काही जागांवर उमेदवार निश्चिती सुरू झाली आहे. त्यामुळं इच्छुकांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. लोकसभेला दणका बसलेल्या महायुतीनंही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, शरद पवारांनी नवनवे डाव टाकत भाजप व अजित पवारांच्या पक्षातील लोक गळाला लावणं सुरू केलं आहे.

Leave a Comment