गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना जेवणातून गुंगीच औषध दिलं, म्हणून ते…..

धुळे – “मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं आणि जीवे मारण्याचा प्रयत्न झाला”, असा खळबळजनक दावा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी जाऊन आणखी खळबळजनक दावा केला आहे.

धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना नितीन देशमुख यांच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला गेला. त्यावर ते म्हणाले, “हो, जवळजवळ तसाच प्रयत्न झाला. अनेक आमदार आहेत, ज्यांना गुंगीच औषध देण्यात आलं. बधीर करण्यात आलं. नितिन देशमुख तिथून पळून आले.

आमचे अजून आमदार आहेते जे तिथे गेल्यावर गुंगीमध्ये होते. त्या हॉटेलच्या किचनचा ताबा या लोकांकडे होता. आमदार खासगीमध्ये सांगतात, खाण्यातून, पेयातून काहीतरी दिलं जात होतं. सात-आठ दिवस काय चाललय ते कळत नव्हतं. काही आमदारांची मानसिक स्थिती बरोबर नव्हती. पण आता हे सिद्ध करणारे पुरावे नाहीत” असं संजय राऊत म्हणाले.

Leave a Comment