चेंबूर परिसरात चाळीतील घराला लागलेल्या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिद्धार्थ कॉलनीमधील एका चाळीतील दुमजली घराला ही आग लागली.
पहाटे पाचच्या दरम्यान ही आग लागली. घराच्या मीटर बॉक्समध्ये शॉकसर्किटमुळे ही आग लागल्याचे म्हटलं जात आहे. त्यानंतर ही आग संपूर्ण घरात पसरत गेली. या दुमजली घरात गुप्ता कुटुंबिय राहत होते. पहाटे साखर झोपेत असताने आग लागल्याने कोणालाच काही समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवत घरातील लोकांना बाहेर काढले. तर मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि दोन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
पारिस गुप्ता (वय 7), मंजू प्रेम गुप्ता (वय 30), अनिता प्रेम गुप्ता (वय 39), प्रेम गुप्ता (वय 30), नरेंद्र गुप्ता (वय 10) अशी यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
