विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून श्रीरामपूर, संगमनेरात इच्छुक कोण?

लोकसभेतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने विधानसभेवर लक्ष केंद्रित केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर आणि संगमनेर वगळता इतर १० मतदारसंघांतून २१ इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली असून, सोमवारी (दि. ७) पुणे येथे पक्षाध्यक्ष शरद पवार स्वतः त्यांच्या मुलाखती घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. फाळके म्हणाले, की विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने इच्छुकांकडून अर्ज मागवले होते.

यात २१ जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील २१ सदस्यांचे पार्लमेंटरी बोर्ड इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे.

श्रीरामपूर, संगमनेरात इच्छुकच नाही!

शरद पवार गटाने आवाहन केल्यानंतरही संगमनेर आणि श्रीरामपुरातही एकही इच्छुक पुढे आलेला नाही. त्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गटाकडे असलेल्या या दोन मतदारसंघांवर पवार गटाचा कोणताही दावा नसेल, हे नक्की झाल्याचे समजते.

Leave a Comment