अन् हेलिकॉप्टरचा अजितदादांनी घेतला धसका? पायलटला म्हणाले…

अकोले : पुण्यातील बावधन बुद्रुक गावाच्या परिसरात बुधवारी सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला.

अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना घेण्यासाठी हे हेलिकॉप्टर मुंबईत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच अपघात घडला होता. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पायलट सोबतचा किस्सा कार्यक्रमात सांगितला आहे.

आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा दाखल झाली. यावेळी अकोलेत अजित पवारांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

अजित पवारांनी सांगितला किस्सा

अजित पवार म्हणाले की, सकाळी ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टर येऊ शकलं नाही. त्यामुळे मी बाय कार आलो. मी पायलटला म्हणालो आपण जाऊ. पण, गेल्याच आठवड्यात एक हेलिकॉप्टर पडलं. तिघं गेले, असं पायलटने सांगितले. त्यामुळे मी कारने आलो, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.

Leave a Comment