Arvind Kejriwal  : तर भाजपचा प्रचार करणार, असं का म्हणाले अरविंद केजरीवाल? वाचा…

दिल्ली : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी छत्रसाल स्टेडियमवर आयोजित जाहीर सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केजरीवालांनी डबल इंजिन सरकार म्हणजे दुहेरी लूट, अशी टीका केली.

तसेच, पंतप्रधान मोदींच्या 10 वर्षांच्या कार्यकाळावरही प्रश्न उपस्थित केला. ‘पंतप्रधान मोदींनी 22 राज्यांमध्ये वीज मोफत केली, तर मी स्वतः मोदींचा प्रचार करेन,’ असा दावाही त्यांनी केला.

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये ‘जनता की अदालत’ कार्यक्रमाला संबोधित करताना अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले. ते म्हणाले की, “या लोकांनी(BJP) 10 वर्षात काहीही केले नाही. PM मोदी पुढील वर्षी 75 वर्षांचे होतील, त्यामुळे निदान आतातरी त्यांनी काही काम करा. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी एनडीए शासित 22 राज्यांमध्ये मोफत वीज देण्याची घोषणा केली, तर मी स्वतः भाजपचा प्रचार करेन”, असे केजरीवाल म्हणाले.

Leave a Comment