अकोले : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर नेत्यांकडून विधासभेच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात सभा आणि मेळावे सुरु आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा अकोलेत दाखल झाली. अकोले येथील सभेत बोलताना अजित पवारांनी थेट उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे.
अजित पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षातील तीनच वर्ष मला काम करायला मिळाले. या तीन वर्षात तुमच्या बहाद्दर आमदाराने (किरण लहामटे) माझ्या मागे लागून अकोले तालुक्यासाठी भरघोस निधी घेतला. आधीचे दोन वर्षे मिळाली असती तर अधिक काम करता आलं असतं. तिजोरीचा भार पाहून मला कामे करावे लागतात.
विधानसभा काही निवडणुकीसाठी ठिकाणी घड्याळ, काही ठिकाणी धनुष्यबाण तर काही ठिकाणी भाजपचे चिन्ह असेल. ही सर्व महायुतीचे चिन्ह आहेत. तुमच्या मतदारसंघात घड्याळ हे चिन्ह असेल, असे म्हणत अजित पवारांनी विद्यमान आमदार किरण लहामटे यांची अकोले विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारी जाहीर केली.
