ब्रेकिंग! ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर शिंदे गटाला मोठा धक्का

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहेत.

त्यातच आता कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण आणि दिपेश म्हात्रे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. यामुळे दिपेश म्हात्रे हे नाराज झाले होते. आता डोंबिवलीतील ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला.

‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली. दिपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

Leave a Comment