भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

सांगली : मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने भाजपला धक्का दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. कोल्हापुरात काँग्रेस राष्ट्रीय नेते व खासदार राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, माजी मंत्री सतेज पाटील, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, भारती सहकारी बँकेचे संचालक जितेश कदम आदी उपस्थित होते.

Leave a Comment