अबब! लाईट गेली अन् तो चुपचाप तिच्या बेडवर जाऊन झोपला अन्….

उत्तर प्रदेशात एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन एका विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर तपास सुरू केला आहे.या प्रकरणातल्या आरोपीसह त्याचे दोन्ही भाऊ फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

उत्तर प्रदेशातल्या भदोही इथे एका विवाहित महिलेच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने या विवाहित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिला या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला दिली असता, तिला तेथून हाकलून देण्यात आलं. त्यामुळे या महिलेनं न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणातला आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.

गोपीगंज पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. 34 वर्षांच्या विवाहित महिलेने याबाबत माहिती देताना सांगितलं, की ’17/18 जुलै रोजी रात्रीच्या वेळी घरातला वीजपुरवठा खंडित झाला होता. त्या वेळी शेजारी राहणारा कंचू (वय 32) चोरून घरात घुसला. त्याची कोणालाही चाहूल लागली नाही. तो माझ्या बेडवर येऊन झोपला. मला पती आहे असं वाटलं. मी त्याच्या कुशीत झोपले. त्यानंतर कंचू माझ्याशी अश्लील वर्तन करू लागला. त्याच्या कृत्यांमुळे मी त्रस्त झाले आणि त्याला जोरात धक्का मारला. त्यानंतर थोडा प्रकाश पडला आणि तो माझा पती नसल्याचं मला दिसलं. मग मी आरडाओरड सुरू केली; पण तोपर्यंत त्याने बलात्कार केला होता. माझा आवाज ऐकून कुटुंबातले आणि शेजारचे लोक जमा झाले.’

पीडित महिलेने आरोपीला पकडून ठेवलं होतं. लोकांनी त्याला मारहाण केली. पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. यादरम्यान गमई आणि बोरा हे कंचूचे दोन्ही भाऊ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेला शिवीगाळ केली. पोलीस दाखल होण्यापूर्वीच तिघेही घटनास्थळावरून फरार झाले.

‘मी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी माहिती दिली; पण मला पोलीस स्टेशनमधून हाकलून देण्यात आलं,’ असा आरोप पीडित महिलेनं केला. प्रकरणाची कोणीच दखल घेत नसल्याने सात ऑगस्टला तिने मुख्य न्यायदंडाधिकारी सबीहा खातून यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने आरोपी कंचूविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. सध्या आरोपी आणि त्याचे दोन्ही भाऊ फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Leave a Comment