साकूरचे सावळेराम खेमनर यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश

संगमनेर(DSNews24/किरण पुरी) तालुक्यातील साकूर जवळील हिरेवाडी येथील कॉंग्रेसच्या विरोधात काम करणारे सावळेराम लहानू खेमनर यांनी आता कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. कॉंग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सावळेराम खेमनर यांनी पक्षात प्रवेश केलाय. खांबे येथील कामधेनू सहकारी उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या शुभारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी हा पक्षप्रवेश पार पडलाय.

या पक्षप्रवेशावेळी संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, थोरात कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, साकूर सोसायटीचे चेअरमन इंद्रजित खेमनर, कॉंग्रेस नेते जयराम ढेरंगे, कॉंग्रेसचे युवा नेते सचिन उर्फ बबलू खेमनर आदि उपस्थित होते.

Leave a Comment