महाराष्ट्रात निवडणुका कधी, आचारसंहिता कधी लागणार? मोठी अपडेट समोर 

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. निवडणुक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. मात्र, अद्याप कोणतीही तारीख झालेली नाही. महाराष्ट्रात निवडणुका कधी होणार? आचार संहिता कधी लागणार? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसेच येत्या दहा दिवसात अनेक जण पक्ष बदलतील असेही अजित पवार म्हणाले. 

येत्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागू होईल. दिवाळी नंतर निवडणुका होतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. सगळेच जण उमेदवार जाहीर करतील. आयाराम गयाराम ही जोरात आहेत. येत्या दहा दिवसात अनेकजण पक्ष बदलताना आपल्याला दिसतील असं मोठ विधान देखील अजित पवार यांनी केले आहे.

Leave a Comment