लाडकी बहीण योजना बंद होणार?

Raj Thackeray: ”आज महायुती सरकार लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहेत. कोणी मागितले होते पैसे? मला आपल्या इकडच्या राजकारण्यांचा उद्देशच कळत नाही. हेतूच कळत नाही. तुमच्याकडे कोणी मागितले होते पैसे?”, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुती सरकारवर लाडकी बहीण योजनेवरून टीका केली आहे.

ही योजना निवडणूक आहे म्हणून या आणि पुढील महिन्यात सुरू असेल, पैसे मिळतील परंतु नंतर बंद होईल; पुढील वर्षी पैसे मिळणार नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, ”महायुती सरकारला फुकटाच्या सवयी लावायच्या आहेत. येथे कोणीच पैसे मागितले नाहीत. लाडकी बहीण योजनेतून महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना सक्षम करा. अशाप्रकारे फुकटाच्या सवयी लागल्या ना, तर सगळ्या राजकीय पक्षांना तसं वागावं लागतं.”, असं ते स्पष्ट म्हणाले. राज ठाकरे यावेळी दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात बोलत होते. त्यांनी महायुती तसेच आघाडी सरकारवर टीका केली.

लाडकी बहीण योजना बंद होणार? राज ठाकरेंना सांगितली परिस्थिती…

”आज मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना आहे ना त्यांची; गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत. यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं सुरू आहे त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल की, या सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकट? महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे… कोणी मागितले आहेत फुकट पैसे? गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट देताय… शेतकरी कुठे मागतोय फुकट? ते फक्त विजेत सातत्य मागत आहे. राज्यात कोणीच फुकट काही मागत नाही. यांना त्या सवयी लावायच्या आहेत.”, असं ते म्हणाले.

Leave a Comment