बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानचे(Salman Khan) निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या कुटुंबीयांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. No visitors please म्हणजे कुणीही भेटायला येवू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मोठी माहिती समोर आलीय. 4 जणांनी सुपारी घेऊन बाबा सिद्दीकींची हत्या केल्याची माहिती सूत्रानं दिलीय. प्रत्येक आरोपी 50 हजार रुपये वाटून घेणार होता. चारही आरोपी 2 सप्टेंबरपासून कुर्ल्यात भाड्याच्या रूममध्ये राहत होते. राहत असलेल्या रूमला 14 हजार रुपयांचं भाडं होतं. पंजाबच्या जेलमध्ये असताना हे तिघेही आरोपी एकमेकांच्या संपर्कात आले होते. अधीच जेलमध्ये असलेला एक आरोपी बिष्णोई गँगशी संबंधित होता. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट गेल्या काही महिन्यांपासून रचल्याचीही माहिती सूत्रानं दिलीय.
