बापरे! शिक्षकाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या, नगर जिल्ह्यातील घटना

शिक्षकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Teacher Suicide) केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.30) उघडकीस आली आहे.

दगडु गुलाब शेख (48, रा. टाकळीमानुर, ता. पाथर्डी) असे आत्महत्या (Suicide) करणार्‍या शिक्षकाचे नाव आहे. ते टाकळीमानुर येथील रहिवासी असून कर्जत तालुक्यातील खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून कार्यरत होते.

पाथर्डी तालुक्यातील तिनखडी ते टाकळीमानुर रोडवरील घाटशिळ पारगाव फाट्याजवळ झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन शेख यांनी आपली जीवन यात्रा संपवली. बुधवारी रात्री त्यांनी आत्महत्या (Suicide) केली असावी असा नातेवाईकांचा अंदाज आहे.

शेख यांच्या मृत्यूचे कारण काय आहे. हे अजून निश्चित समजू शकले नाही. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Leave a Comment