संगमनेर(DSNews24/किरण पुरी) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा प्रमुख सामना पाहायला मिळणार आहे. तसेच इतरही पक्ष निवडणुकीसाठी सज्ज असल्याने जोरदार बैठका सुरू आहे.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील साकूर गटातून एक मोठी बातमी समोर आलीय. साकूर गटाची महत्त्वपूर्ण तातडीची बैठक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. ही महत्वपूर्ण बैठक साकूर जवळील बिरेवाडी येथे रविवार दि. २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता हनुमान मंदिरातील सभामंडपात आयोजित करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाचे संगमनेर तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले, उप तालुका प्रमुख संदिप खिलारी, युवा सेना तालुका प्रमुख योगेश खेमनर, जिल्हा सह संघटक एकनाथ खेमनर, महिला आघाडीच्या उप तालुका प्रमुख उज्वला गुळवे यांनी दिलीय.
दरम्यान या बैठकीसाठी पठार भागातील सर्व गट प्रमुख, शाखा प्रमुख, गण प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडी, तसेच ठाकरे गटाचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक व पठार भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान ही बैठक महत्वपूर्ण असून ताताडीने बोलावली असून नेमकं यामागच कारण समजले नाही. मात्र सोमवारी साकूरमध्ये भाजप नेते माजी खासदार सुजय विखे यांची जाहीर सभा होणार असून त्या पुर्वीच ही बैठक होणार असल्याने मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे. तसेच बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात येणार आहे? ते बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
