मोठी बातमी! उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस निवडणुकीनंतर एकत्र येणार…..

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागावाटपावरून अनेक अंतर्गत वाद पाहायला मिळत आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येतील अशी भीती व्यक्त होत आहे असा दावा त्यांनी केला.

आंबेडकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठका सुरू आहेत. निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे बहुजन समाजाने आणि मुस्लिम समाजाने यांना बळी पडून त्यांना मतदान करू नये. कारण येणाऱ्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जातील.

ते यावेळी पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी त्यांच्याकडून ते पुढचे पाच वर्ष तुमच्या सोबत राहतील, असे लिहून घ्या असे मुस्लीम समाज सांगत आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लीम समाजाला काय आश्वासन देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

तसेच, दिल्लीत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांची भेट घेतल्याचा दावा काँग्रेस पक्षातील एका नेत्याने केल्याची चर्चा रंगली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाकडून स्पष्टीकरण आले असून असे काहीही घडलेले नसल्याचे स्पष्ट केले आहे.

यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनादेखील माध्यमांसमोर विचारण्यात आला. यावरून त्यांनी भाजपकडून अशा बातम्या पेरल्या जात असल्याचे सांगत टीका केली.

Leave a Comment