मोठी बातमी! पारनेरमधून अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर

राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून उमेदवारी याद्या जाहीर होत आहेत. आज महायुतीतील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यतील पारनेर विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते यांना तिकीट मिळालं आहे.

राज्यात चर्चेत असलेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने खासदार निलेेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीत हा मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाला होता. त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला तिकीट मिळणार असा प्रश्न होता. तिकीट मिळेल या अपेक्षेने काही दिवसांपुर्वीच पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता.

त्यामुळे या नेत्यांपैकीच एकाला संधी मिळेल अशी चर्चा होती. काही दिवसांपूर्वी विजय औटी यांनी पारनेरात जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला अजित पवार स्वतः उपस्थित होते. या सभेत अजितदादांनी निलेश लंकेंवर सडकून टीका केली होती. मात्र या मतदारसंघात कुणाला तिकीट देणार याचे संकेत या सभेत मिळाले नव्हते. त्यानंतर मात्र आज पक्षाने पारनेर मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार गटाने अनुभवी नेते काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

1 thought on “मोठी बातमी! पारनेरमधून अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर”

Leave a Reply to Jay maharshtra Cancel reply